सिंधुदूर्ग जिल्हयातील पयर्टन स्थळाच्या विकासाबाबत सद्यस्थिती: एक भौगोलिक अभ्यास.

Author Name : डाॅ. हंणमत लक्ष्मण नारायणकर
Volume : I, Issue :X,June - 2016
Published on : 2016-06-23 , By : IRJI Publication

Abstract :

भारताच्या आर्थिक विकासाचे सूक्ष्म पध्दतीने अवलोकन केल्यास पर्यटन उद्योगाचा विकास करणे, ही एक महत्वपुर्ण बाब असल्याचे दिसून येते.पर्यटन उद्योगाचा विकास करताना नियोजनपूर्वक केल्यास विकासाचा मुख्य उद्देश साधता येतो. हा विकास करताना पर्यटन स्थळी उपलब्ध असलेल्या मूलभूत सेवा सुविधा व समस्या यांचे नियोजन करणे आवश्यक असते. नियोजनात शासकीय विभागासह खाजगी विभागाला ही महत्वाचे स्थान असते. यातूनच शाश्वत व निरंतर विकासाची संकल्पना उदयाला येते.