साहित्य आणि इतिहास - अनुबंध

Author Name : प्रा. डाॅ. भास्कर निफाडे
Volume : I, Issue :X,June - 2016
Published on : 2016-06-28 , By : IRJI Publication

Abstract :

आज आपण वर्तमानकाळात जगतो आहोत आणि गतिशील इतिहास हा आपल्या जाणिवेचा भाग झालेला आहे सामुहिक नेणिवेत तर आदिकालापासूनचा इतिहास जळागाळाषी साठून राहिला आहे. प्रसिध्द इतिहासतज्ज्ञ शूबर्टने माणसाची धारणा ‘ऐतिहासिक प्राणी म्हणून केलेली आहे?’ माणूस इतिहासाशिवाय जगू शकत नाही हे एकविसाव्या शतकात वाटचाल करणा-या आणि मानवजातीच्या भविष्याविशयी साशंक झालेल्या आजच्या माणसाविषयीचे प्रखर सत्य आहे. माणसाचं सामाजिक असणं जेवढं स्वाभाविक तेवढंच इतिहास संबंध असणं अनिवार्य आहे.